Himachal Pradesh : हिमाचल आपदाग्रस्त राज्य जाहीर; वेगवेगळ्या दुर्घटनांत आतापर्यंत 330 जणांचा मृत्यू | पुढारी

Himachal Pradesh : हिमाचल आपदाग्रस्त राज्य जाहीर; वेगवेगळ्या दुर्घटनांत आतापर्यंत 330 जणांचा मृत्यू

सिमला; वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेश राज्य सरकारने शुक्रवारी राज्याला आपदाग्रस्त (स्टेट डिझास्टर) जाहीर केले. मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी तशी अधिसूचनाही जारी केली.

हिमाचल प्रदेशात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या ५५ दिवसांत या राज्यात ११३ भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनासह अन्य दुर्घटनांत ३३० जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मते पावसामुळे राज्यात १० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे.

बचावकार्य सुरूच

सिमल्यातील समर हिल भागात सतत पाचव्या दिवशी शुक्रवारीही बचाव कार्य सुरू होते. १४ ऑगस्ट रोजी येथील शिव मंदिर भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले होते. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १४ मृतदेह काढण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button