Adhir Ranjan Chowdhury: लोकसभेतून निलंबित अधीर रंजन चौधरींना विशेषाधिकार समितीकडून बाजू मांडण्याची संधी मिळणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क: विरोधी पक्षातील काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांना पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर १० ऑगस्ट रोजी लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. या समितीची बैठक आज पार पाडली. समितीने अधीर रंजन (Adhir Ranjan Chowdhury) यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
The Privilege Committee of Lok Sabha has decided to give an opportunity to Congress MP Adhir Ranjan Chowdhury to appear before the Committee to respond to allegations against him. He may be asked to appear before the Committee on August 30, the next date of the meeting of the…
— ANI (@ANI) August 18, 2023
लोकसभेत काँग्रेस नेत्याचे निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधीर रंजन चौधरी यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले आहे. या समितीचा संपूर्ण अहवाल येईपर्यंत त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान आज लोकसभेच्या या विशेषाधिकार समितीची आज बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी समितीसमोर हजर राहण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना 30 ऑगस्ट रोजी समितीसमोर (Adhir Ranjan Chowdhury) हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशी माहिती देखील संसद सूत्रांनी दिली असल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींनी मांडला होता निलंबनाचा प्रस्ताव
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशन-२०२३ दरम्यान संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत एक प्रस्ताव मांडला की, “अधीर रंजन चौधरी सभागृहाच्या आणि सभापतींच्या अधिकारांची अवहेलना केली आहे. सभागृहाने त्यांनी जाणूनबुजून आणि वारंवार केलेल्या गैरवर्तनाची दखल घेतली आहे. त्यांच्या गैरवर्तवणुकीचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात येईल. समिती चौकशी करुन अहवाल देईपर्यंत अधीर रंजन चौधरी सभागृहातून निलंबित राहतील.
हेही वाचा:
- राष्ट्रवादीतील मतभेद वैयक्तिक नव्हे तर वैचारिक : खा. सुप्रिया सुळे
- Cabinet Decision | गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय