मुंबई, पुढारी ऑनलाईन : गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा हा शिधा असेल. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. (Cabinet Decision)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा :