सीमा हैदर रिटर्न्स: भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी उज्बेकिस्तान महिलेला अटक | पुढारी

सीमा हैदर रिटर्न्स: भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी उज्बेकिस्तान महिलेला अटक

पुढारी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवरील सोनौली परिसरात वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उज्बेकिस्तानच्या महिलेला मंगळवारी अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. सोनौली इमिग्रेशन चेक पोस्टचे अधिकारी आर.के. मुझुमदार म्हणाले की, नेपाळमधून भारतात दाखल होत असलेल्या उझबेकिस्तानची रहिवासी दिलबर राखीमोवाला नियमित तपासणीसाठी थांबवण्यात आले. तिच्याकडे उझबेकिस्तानचा पासपोर्ट होता, पण भारतीय व्हिसा सापडला नाही. वैध व्हिसाशिवाय भारतात प्रवेश केल्याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इंटेलिजन्स ब्युरोला कळवण्यात आल्याचे मुझुमदार यांनी सांगितले.

गुडगावमध्ये मित्राच्या घरी थांबली

नेपाळमधून भारतात बेकायदेशीरपणे दाखल झालेली उझबेकिस्तानची महिला गुडगाव येथे तिचा मित्र कार्तिकच्या घरी थांबली होती. त्यानंतर ती 8 ऑगस्टला जयपूरला गेली. 10 ऑगस्टच्या दुपारपर्यंत ती उदयपूरमध्येच होती. संध्याकाळी दिल्लीला जाण्यासाठी निघाली . यानंतर ती ११ ऑगस्टला गोरखपूरला पोहोचली आणि सोनौली सीमेवरून नेपाळला गेली. तिथेच परतताना तपासात तिला पकडले. सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार तिच्याकडे दिल्लीत बनवलेले बनावट आधार कार्ड मिळाले. दिल्लीत तिचे बनावट आधार कार्ड कोठून तयार करण्यात आले, याचा पोलीस तपास करत आहेत. बनावट आधारकार्डच्या मदतीने अनधिकृतपणे सीमा ओलांडल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. भारत ते नेपाळ प्रवासाचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे तपासात समोर आले आहे. यावरून ती इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता अनधिकृतपणे नेपाळमध्ये गेल्याचे दिसून येते. सीमेवर सुरक्षेत गुंतलेल्या जवानांनाही याचा सुगावा लागला नाही. तिथून निघताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देण्यात ती यशस्वी झाली.

दिलबर राखीमोवाने दिल्लीतील तिचा मित्र कार्तिकसोबत राजस्थानमधील उदयपूर आणि जयपूर येथे दोन दिवस घालवले होते. याआधी दोन दिवस दिल्लीत मुक्काम केला. ती देशात आरामात फिरली. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीला पोहोचले. त्यानंतर रोडवेजच्या बसने गोरखपूरला पोहोचली. इथून तिने टॅक्सी बुक केली आणि थेट सोनौली गाठली. इमिग्रेशन विभागाला चकमा देऊन ती आरामात नेपाळला गेली. नेपाळमधील भैरहवा येथे तिने दिल्लीस्थित मैत्रिण निक्कीच्या नावाने एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम बुक केली. ती तीन दिवस हॉटेलमध्ये राहिली. येथून तिने दिल्लीला जाण्यासाठी बेल्हिया गाठले.

सीमेवरील परिस्थिती पाहिल्यानंतर आता सीमा ओलांडली पाहिजे असे तिला समजले, म्हणून तिने तोंड बांधून सीमा ओलांडण्यास सुरुवात केली. घाईत जाताना पाहून पावलांनी एसएसबी जवानांना संशय आल्याने तिला रोखले. त्यांना संभाषणाची भाषा समजू शकली नाही. यानंतर तिला थांबवून तपासणी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आवश्यक चौकशीनंतर गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला कारागृहात पाठवण्यात आले. सोनौली येथून पकडलेल्या महिलेने तिचे नाव ‘दिलबर राखीमोवा’ आणि पत्ता उझबेकिस्तान असल्याचे सांगितले. सीमा हैदर प्रकरणातील चूक झाल्यापासून सीमेवरील सुरक्षा अधिक कडक झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button