पुणे : निवृत्त जवानाकडून गोळीबार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून सैन्यदलातून निवृत्त झालेल्या काकाने पुतण्यावर गोळीबार केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. सुदैवाने या घटनेत पुतण्याला दुखापत झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी काकाला अटक केली. प्रदीप तुकाराम जाधव (वय 44, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे. याबाबत पुतण्या विकास जाधव (वय 24) याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रदीप जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत.
त्यांच्याकडे बारा बोरची परवाना असलेली रायफल आहे. प्रदीप आणि त्याचा पुतण्या विकास यांच्यात वाद झाला होता. वादातून प्रदीप याने पुतण्या विकास याच्या दिशेने रायफलीतून तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने विकास याला दुखापत झाली नाही. दोघेही शेजारी-शेजारी राहण्यास आहेत. हा प्रकार घडल्यानंतर विकास याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून प्रदीप याला अटक केली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक खोसे करीत आहेत.
हेही वाचा :