पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी शेअर बाजारात चढ-उतार राहिला. सुरुवातीच्या घसरणीनंतर दुसऱ्या सत्रात बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. मुख्यतः आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. सेन्सेक्स १३७ अंकांनी वाढून ६५,५३९ वर बंद झाला. तर निफ्टी ३० अंकांच्या वाढीसह १९,४६५ वर स्थिरावला. आज बँक आणि मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ऑटो, पॉवर, रियल्टी, आयटी, फार्मा आणि कॅपिटल गुड्स ०.५ ते १ टक्क्यांनी वाढून हिरव्या चिन्हात बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढले. बँकिंग शेअर्समध्ये अधिक कमकुवत स्थिती दिसून आली. तर आयटी क्षेत्रात खालच्या पातळीवरून खरेदी झाली. (Share Market Closing Bell)
सेन्सेक्स आज ६५,२३८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो सुमारे ३०० अंकांहून अधिक घसरुन ६५,०३२ पर्यंत खाली आला. त्यानंतर रिकव्हरी करत त्याने ६५,४०० चा आकडा पार केला. सेन्सेक्स आज अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर २.३५ टक्के वाढून ८,२३८ रुपयांवर पोहोचला. तर टाटा मोटर्सचा शेअर २ टक्के वाढीसह ६१९ रुपयांवर गेला. एनटीपीसी, इन्फोसिस, एम अँड एम, पॉवर ग्रिड, मारुती हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. एलटी, पॉवर ग्रिड, एसबीआय, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्सही तेजीत राहिले. टाटा स्टीलचा शेअर टॉप लूजर्स ठरला. हा शेअर २ टक्के घसरून ११५ रुपयांवर आला. भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले.
डिजिटल कम्युनिकेशन फर्मसाठी मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि स्केल करण्यासाठी IT दिग्गज असलेल्या इन्फोसिसने (Infosys shares) लिबर्टी ग्लोबलशी १.६४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचा शेअर आज सुमारे २ टक्क्यांनी वाढून १,४१९ रुपयांवर पोहोचला.
दूरसंचार ऑपरेटर कर्जबाजारी असलेल्या व्होडाफोन आयडियाने जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत ७,८४० रुपये कोटींचा तोटा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील तोट्यापेक्षा हा अधिक तोटा आहे. यामुळे Vodafone Idea (Vi) चे शेअर्स BSE वर बुधवारच्या व्यवहारात सुमारे ३ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, मागील वर्षीच्या याच तिमाहीतल १०,४१० कोटींच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत त्याच्या कामकाजातील महसूल किरकोळ २ टक्के वाढून १०,६५५ कोटी रुपये झाला आहे. (Share Market Closing Bell)
चीनमधील निराशाजनक स्थितीची आकडेवारी तसेच अमेरिकेतील आर्थिक चिंतेमुळे आज आशियाई बाजारात (Asian shares) घसरण राहिली. जपानचा निक्केई २२५ (Japan's benchmark Nikkei 225) निर्देशांक १.३ टक्क्यांनी घसरून ३१,८०५ वर आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.६ टक्के घसरणीसह २,५२८ वर आला. हाँगकाँगचा हँगसेंग (Hong Kong's Hang Seng) १.५ टक्के घसरून १८,३०९ पर्यंत खाली आला. शांघाय कंपोझिट ०.५ टक्के घसरण झाली आहे. चीनमधील अधिक कमकुवत आर्थिक स्थिती आणि वाढत्या मालमत्ता क्षेत्रातील संकटामुळे आशियातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी आशियाई बाजार धडाधड कोसळले.
हे ही वाचा :