Tech layoffs in 2023 | टेक कंपन्यांत नोकरकपातीची लाट! यंदा तब्बल २ लाख २६ हजार जणांना नारळ

Tech layoffs in 2023 | टेक कंपन्यांत नोकरकपातीची लाट! यंदा तब्बल २ लाख २६ हजार जणांना नारळ

पुढारी ऑनलाईन : टेक उद्योगात नोकरकपातीची लाट आली आहे. यावर्षी टेक कंपन्यांनी तब्बल २ लाख २६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. AltIndex च्या आकडेवारीनुसार, टेक कंपन्यांत २०२२ मध्ये २ लाख २ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोकरकपातीत ४० टक्के वाढ झाली आहे. यावरून २०२३ मधील परिस्थिती अधिक भयावह असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच टेक क्षेत्रातून मंदीचे संकेत मिळत आहेत. (Tech layoffs in 2023)

नोकरकपातीच्या या लाटेचा खोलवर परिणाम झाला आहे, परिणामी अनेक कामाची ठिकाणे बंद झाली आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत टेक उद्योगात नोकरकपात अधिक झाली. या कालावधीत तब्बल १ लाख ६४ हजार ७४४ कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागली. याआधीच्या वर्षी नोंदवलेल्या १५ हजारांच्या तुलनेत ही संख्या जवळपास अकरा पट अधिक आहे.

दरम्यान २०२३ मध्ये नोकरकपातीचा आकडा वाढला. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, जानेवारीच्या एका महिन्यात ७५,९१२ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या, २०२२ मध्ये नोंदवलेल्या एकूण नोकरकपातीच्या हे प्रमाण जवळपास निम्मे आहे. फेब्रुवारीमध्ये सुमारे ४० हजार लोकांना कामावरुन कमी केले. त्यानंतरच्या पुढील तीन महिन्यांत नोकरकपातीचा आकडा कमी असली तरी, टेक कंपन्यांनी या कालावधीत सुमारे ७३ हजार नोकऱ्या कमी केल्या. त्यानंतर आणखी सुमारे २४ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागली. यावर्षी गेल्या आठवड्यापर्यंत एकूण नोकरकपातीचा आकडा २,२६,११७ वर गेला.

३ वर्षांत ४ लाखांहून अधिक नोकरकपात

अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाईत झालेली वाढ, पुरवठा साखळीतील अडथळे आणि महसुलातील वाढ मंदावणे यासह अनेक कारणांमुळे नोकऱ्या कपातीची तीव्रता वाढली. गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन सारख्या दिग्गज कंपन्या या नोकरकपातीच्या लाटेत आघाडीवर आहेत. रिटेल, क्रिप्टोकरन्सी आणि वाहतूक यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या छोट्या टेक कंपन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून आला. गेल्या तीन वर्षांचा मागोवा घेतला असता नोकरकपातीची आकडेवारी आणखी गंभीर चित्र दर्शवते. २०२१ च्या सुरुवातीपासून टेक कंपन्यांनी ४ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले.

२०२३ मधील नोकरकपातीच्या लाटेत अमेरिकेतील दिग्गज टेक कंपन्यांचा समावेश होता. आकडेवारी अशी दर्शवते की अमेरिकेतील कंपन्यांनी या वर्षी १० पैकी ८ सर्वात मोठ्या नोकर्‍या कपात केल्या आहेत. (Tech layoffs in 2023)

दहा कंपन्यांत सर्वाधिक नोकरकपात

विश्लेषणानुसार, Google ने केवळ २०२३ मध्येच नव्हे तर कोरोना काळापासून नोकरकपात केली आहे. गुगलने १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ही नोकरकपात मेटा आणि मायक्रोसॉफ्ट पेक्षा दोन हजारने अधिक आहे. ॲमेझॉनने या वर्षी चौथ्या मोठी नोकरकपात केली. त्यांनी ९ हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. फ्लिंक, सेल्सफोर्स आणि डेल यांनी अनुक्रमे ८,५००, ८ हजार आणि ६,६५० नोकऱ्या कमी केल्या आहेत. आकडेवारी अशीही दर्शवते की या वर्षी टेक उद्योगातील एकूण नोकरकपातीपैकी सुमारे एक तृतीयांश म्हणजेच सुमारे ७९ हजार कर्मचारी कपात दहा कंपन्यांतील आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news