पुढारी ऑनलाईन : जगभरात नोकरकपातीची लाट सुरुच आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'डिस्ने' (Disney layoffs) पुन्हा एकदा नोकरकपात करत असून याचा फटका २,५०० कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. CNN च्या वृत्तानुसार, या नोकरकपातीचा २,५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. ही नोकरकपात डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या कपातीचा कळस आहे.
Disney मध्ये नोकरकपातीची तिसरी फेरी सुरु आहे. ही प्रक्रिया या आठवड्यात संपणार आहे. यामुळे Disney मधून नोकरी गमवावी लागलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६,५०० च्या पुढे जाणार आहे. कंपनीने यापूर्वी ७ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती.
डिस्नेने जागतिक स्तरावर २ लाख २० हजार लोकांना रोजगार दिला आहे. यातील ७ हजार कर्मचारी कमी केले जात असून हे प्रमाण एकूण मनुष्यबळाच्या ३ टक्के इतके आहे.
नोकरकपातीच्या पहिल्या दोन फेऱ्या मार्च आणि एप्रिलमध्ये झाल्या. या दरम्यान ४ हजार लोकांना कामावरुन काढून टाकण्यात आले. विशेष म्हणजे या कपातीमुळे कंपनीच्या विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ज्यात ESPN, Disney's entertainment विभाग, तसेच Disney Parks आणि त्याचे Experiences आणि प्रोडक्ट विभाग यांचा समावेश आहे.
या नोकरकपातीचा निर्णय सुरुवातीला डिस्नेचे सीईओ बॉब इगर (Disney CEO Bob Iger) फेब्रुवारीमध्ये जाहीर केला होता. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तीन फेऱ्यांत सुमारे ७ हजार कर्मचारी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ५.५ अब्ज डॉलर्सचे खर्च बचतीचे उद्दिष्ट साध्य करणे हा यामागील उद्देश होता. नोकरकपाचीची सध्याची लाट या उद्दिष्टाच्या ३० टक्के आहे. (Disney layoffs)
हे ही वाचा :