HCLTech | जगभरात नोकरकपातीची लाट, पण ‘या’ भारतीय IT कंपनीमध्ये १ हजार कर्मचाऱ्यांची भरती! | पुढारी

HCLTech | जगभरात नोकरकपातीची लाट, पण 'या' भारतीय IT कंपनीमध्ये १ हजार कर्मचाऱ्यांची भरती!

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील टेक कंपन्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. पण अशा परिस्थितीत एका भारतीय IT कंपनीने नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे. एचसीएल टेक (HCLTech) कंपनीने पुढील दोन वर्षांमध्ये रोमानियामध्ये १ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना जाहीर केली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ही कंपनी रोमानियामध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे आणि रोमानियन विद्यापीठांसोबतच्या भागीदारीद्वारे नवीन भरतीतील एक तृतीयांश जागा पदवीधारांसाठी ऑफर करणार आहे.

HCLTech गेल्या पाच वर्षांपासून रोमानियामध्ये कार्यरत आहे आणि जगातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी येथे आधीच सुमारे १ हजार कर्मचारी काम करत आहेत. स्थानिक टॅलेटला टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करण्यास अधिक संधी निर्माण करण्यासाठी कंपनी बुखारेस्ट आणि लासी येथे आपली कार्यालयांचा विस्तार करणार आहे.

“आम्ही रोमानियामधील स्थानिक टॅलेंटला टेक्नॉलॉजीत करिअर करण्यास संधी निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत,” असे HCLTech चे रोमानियाचे कंट्री लीड युलियन पडुरारू यांनी म्हटले आहे. रोमानियामधील कंपनीचा इंटर्नशिप कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आणि त्यांना प्रवेश-स्तरीय तंत्रज्ञान भूमिकांसाठी नियुक्त करण्यात मदत करेल.

IDC मधील असोसिएट कन्सल्टंट अलेक्झांड्रा सिमोन यांनी सांगितले की, “HCLTech ही रोमानियामधील एक महत्त्वाची कंपनी आहे. आम्‍हाला आशा आहे की, स्‍थानिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवल्‍याने आणि रोमानियामध्‍ये टेक्नॉलॉजी ऑफर वाढविल्‍याने त्‍याच्‍या व्यवसाय वाढीस मदत होईल.”

टेक क्षेत्रात मोठी नोकरकपात

गुगल, अॅमेझॉन आणि मेटा यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली. गुगलने जानेवारीत १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मेटा आणि ॲमेझॉनने दोन वेळा नोकरकपात केली. यात त्यांनी अनुक्रमे २१ हजार आणि २७ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले.

हे ही वाचा :

Back to top button