पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ४४५ अंकांनी घसरून ६४,८७७ पर्यंत खाली आला. तर निफ्टी १२८ अंकांनी घसरून १९,२९९ वर खुला झाला. देशांतर्गत किरकोळ महागाई आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय इक्विटी निर्देशांक सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात लाल चिन्हात खुले झाले. सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर इन्फोसिस वगळता इतर सर्व शेअर्स लाल चिन्हात खुले झाले आहेत. टाटा मोटर्स, एसबीआय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अदानी एंटरप्रायजेस, नायकाचे शेअर्स प्रत्येकी ४ टक्क्यांनी घसरले आहेत. (Stock Market Updates)
आशियाई बाजारातही घसरण दिसून आली आहे. जपानचा टॉपिक्स ०.३ टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग १.९ टक्के, शांघाय कंपोझिट ०.८ टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market Updates)
दरम्यान, आज शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८ पैशांनी घसरून ८२.७४ वर आला.
हे ही वाचा :