आता Pin शिवाय UPI Lite द्वारे करा ५०० रुपयांपर्यंत पेमेंट, RBI चा निर्णय | पुढारी

आता Pin शिवाय UPI Lite द्वारे करा ५०० रुपयांपर्यंत पेमेंट, RBI चा निर्णय

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी यूपीआय लाइट (UPI Lite) ची व्यवहार मर्यादा २०० वरून ५०० रुपयांपर्यंत वाढवली. UPI Lite हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI ने सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच केले होते. UPI Lite द्वारे व्यवहाराची मर्यादा २०० रुपये होती. आती ती ५०० रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे आता यूजर्संना यूपीआय पिनचा वापर न करता रिअल टाइममध्ये ५०० रुपयांपर्यंत रक्कम पेमेंट करता येणार आहे.

पतविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयांची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “यूजर्संसाठी डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने कमी रकमेच्या डिजिटल पेमेंट्सची व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही व्यवहार मर्यादा ऑफलाइन मोडवर २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे. यामुळे देशात डिजिटल पेमेंटचा वापर वाढण्यास मदत होईल.”

UPI Lite म्हणजे काय?

UPI Lite हे ‘ऑन-डिव्हाइस वॉलेट’ फिचर आहे ज्यामुळे यूजर्संना UPI पिन न वापरता रिअल टाइममध्ये कमी रक्कम पेमेंट करता येते.

UPI Lite चा वापर कसा करावा?

पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून अॅपवर वॉलेटमध्ये पैसे टाकावे लागतील. त्यानंतर तुम्ही ते प्री-लोडेड केलेले पैसे UPI Lite द्वारे वॉलेटमधून पेमेंट करण्यासाठी वापरू शकता. ऑन-डिव्हाइस वॉलेटसाठी UPI Lite बॅलेन्ससाठी एकूण मर्यादा कोणत्याही वेळी २ हजार रुपये असेल.

रेपो रेट जैसे थे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जैसे थे म्हणजे ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो दरात बदल केलेला नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत (Monetary Policy Committee) घेतलेल्या या निर्णयाची आज माहिती दिली. (RBI monetary policy) ”पतधोरण समितीने रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे”, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button