तापाचे उपचार घेणाऱ्या मुलाला दिले चक्क रेबिजचे इंजेक्शन | पुढारी

तापाचे उपचार घेणाऱ्या मुलाला दिले चक्क रेबिजचे इंजेक्शन

थिरुअनंतपूरम; वृत्तसंस्था : तापाची उपचार घ्यायला आलेल्या बालकाला चक्क रेबिजचे इंजेक्शन देणाऱ्या नर्सला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची घटना केरळात घडली.

एर्नाकुलमजवळच्या अंगमल्ली येथील तालुका रुग्णालयात हा प्रकार घडला. तेथे तापाने फणफणलेला एक सात वर्षीय मुलगा पालकांसह रक्त चाचणीसाठी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेबाहेर बसला होता. त्याची कागदपत्रे तयार करण्यासाठी त्याचे आई-वडील गेले असताना आत असणाऱ्या एका नर्सने या मुलाला बोलावले व त्याला चक्क रेबिजचे इंजेक्शन दिले. या इंजेक्शनचे साईड इफेक्ट नसल्याने पालकांनी नर्सच्या विरोधात तक्रार मागे घेतली; पण आरोग्य प्रशासनाने या नर्सला कामावरून कमी केले.

हेही वाचा : 

Back to top button