‘Open AI दररोज करते तब्‍बल ५.८० कोटी रुपये खर्च! कंपनी २०२४ मध्ये दिवाळखोरीत निघू शकते’ | पुढारी

'Open AI दररोज करते तब्‍बल ५.८० कोटी रुपये खर्च! कंपनी २०२४ मध्ये दिवाळखोरीत निघू शकते'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चॅट जीपीटीची Open AI कंपनी सेवा चालवण्यासाठी दररोज सुमारे 700,000 डॉलर ( 5.80 कोटी रुपये) खर्च करत आहे. मागील वर्षभरातील आर्थिक स्‍तर पाहता सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील कंपनी २०२४ च्या अखेरीस दिवाळखोरीत निघू शकते, असे भाकित ‘ॲनालिटिक्स इंडिया मॅगझिन’च्या रिपोर्टमध्‍ये (अहवालात) करण्‍यात आले आहे.

Open AI : सुरुवात धमाकेदार पण…

ChatGPT ॲप नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये लॉन्‍च झाले. सर्वात वेगाने वाढणारे अॅप अशीही त्‍याची ओळख झाली होती; परंतु सुरुवातीच्या काळातील वापरकर्त्यांच्या विक्रमी ओघानंतर अलीकडील काही महिन्यांत वापरकर्त्यांच्या सहभागामध्ये हळूहळू घट होत आहे. ‘अॅनालिटिक्स इंडिया मॅगझिन’च्या रिपोर्टनुसार, सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील कंपनीने GPT-3.5 आणि GPT-4 ची कमाई करण्याचा प्रयत्न करूनही कंपनी या टप्प्यावर संघर्ष करत आहे. अपेक्षित महसूल निर्मितीत अपयश आले आहे, असेही या रिपोर्टमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

मायक्रोसॉफ्टच्‍या गुंतवणुकीमुळे मदत; पण नुकसान दुप्पट

अॅनालिटिक्स इंडिया मॅगझिनच्या अहवालात म्हटले आहे की, अनेक मुक्त-स्रोत LLM मॉडेल्स आहेत जी वापरण्यासाठी विनामूल्य आहे. ‘मेटा’चे लामा 2, मायक्रोसॉफ्टच्या भागीदारीत, लोकांना व्यावसायिक हेतूंसाठी मॉडेल वापरण्याची परवानगी देत ​​आहे. ChatGPT विकसित करण्यास सुरुवात केल्यापासून त्याचे नुकसान दुप्पट होऊन ५४० दक्षलक्ष डॉलर झाले आहे. ओपन एआयमध्ये मायक्रोसॉफ्टची १० अब्‍ज डॉलर गुंतवणूक कदाचित कंपनीला चालना देत आहे; परंतु दुसरीकडे, OpenAI ने 2023 मध्ये २०० दशलक्ष डॉलर वार्षिक कमाईचा अंदाज वर्तवला होता. 2024 मध्ये एक अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जे नुकसान फक्त वाढतच असल्याचे दिसत असल्‍याचे, असेही अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

Open AI : वापरकर्त्यांच्या सहभागामध्ये हळूहळू घट

जुलैच्या अखेरीस ChatGPT चा वापरकर्ता आधार आणखी कमी झाला. जुलै 2023 मध्ये जूनच्या तुलनेत वापरकर्त्यांच्या संख्येत १२ टक्के घट झाली, १.७ अब्ज वापरकर्त्यांवरून १.५ अब्ज वापरकर्त्यांपर्यंत घसरण झाली, असे SimilarWeb डेटामध्ये म्हटले आहे. अनेक कंपन्यांनी पूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ChatGPT वापरण्यापासून परावृत्त केले होते, त्यांनी आता OpenAI च्या API मध्ये प्रवेश मिळवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांना विविध कार्यप्रवाहांसाठी त्यांचे स्वतःचे AI चॅटबॉट्स तयार करता आले आहेत.

चॅट जीपीटी असे करते ग्राहकांना मदत

चॅट जीपीटी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडल आहे जे Open AI या कंपनीने तयार केले आहे. हे ओपन AI चॅटबॉट म्हणूनही ओळखले जाते. चॅट जीपीटी यामध्ये आपण त्याला प्रश्न विचारू शकतो, याची उत्तरे ते इंटरनेटवरचा सर्व डाटा, पुस्तके, वेबसाइट्स यावर उपलब्ध असलेल्या माहितीवरून परिणाम दर्शवते. त्यावरून तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता. म्हणजेच, ईमेल लिहिण्यापासून ते सीव्हीपर्यंत, तुम्ही ते बनवू शकता. चॅटजीपीटी रील किंवा तुमचा व्हिडिओ कसा व्हायरल करायचा याचे उत्तर देखील देते. चॅटजीपीटी तुम्हाला तुमच्या पत्नीला काय भेटवस्तू द्यायचे याबद्दल सूचना देखील देते.

हेही वाचा

Back to top button