पुढारी ऑनलाईन : पीएफ खातेधारक त्यांच्या अथवा कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी पीएफ फंडातून ॲडव्हान्स पैसे काढू शकतात. कुटुंबातील सदस्यांत मुलगा- मुलगी भाऊ-बहीण यांचा समावेश आहे. याचाच अर्थ तुम्ही कुटुंबातील या सदस्यांच्या लग्नाकरिता पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. यासाठी पीएफ खातेधारकांना जमा रकमेच्या ५० टक्के हिस्सा काढता येतो. (EPF advance for marriage)
नोकरी करणारे लोक बचत म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत गुंतवणूक करतात. या रकमेवर सरकारकडून व्याज मिळते. यात पगारातील एक ठराविक रक्कम जमा केली जाते. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.१५ टक्के इतका व्याजदर निर्धारित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ८.१ टक्के इतका व्याजदर देण्यात आला होता. १९७७-७८ नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर होता. तुम्हाला हे माहित आहे का की खातेधारक गरज पडल्यास त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात.
हे ही वाचा :