महाराष्ट्र, गोव्यातील खासदारांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक | पुढारी

महाराष्ट्र, गोव्यातील खासदारांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक राहीले असतांना केंद्रातील सत्ताधारी भाजपने एनडीएच्या माध्यमातून आघाडी अधिक भक्कम करण्यास सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए मधील खासदारांसोबत बैठक घेत त्यांच्यासोबत संवाद साधत आहे. मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांसोबत संवाद साधला.नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित या बैठकीत ४८ खासदार उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या ९ वर्षांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित कार्यक्रमाच्या सुरूवातील खासदारांना दाखवण्यात आली. जवळपास ४० मिनिटांच्या भाषणातून पंतप्रधानांनी आगामी निवडणूक ही एनडीए म्हणूनच लढवली जाईल, असे स्पष्ट केले. आगामी निवडणुकीला समोर जात असतांना तळागाळापर्यंत सरकारी योजना पोहचवण्याचे तसेच सरकारचे चांगले काम पोहचवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी खासदारांना दिल्या.

बैठकीदरम्यान राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही. कुणावरही राजकीय टिपण्या करण्यात आल्या नसल्याची माहिती खासदारांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील खासदारांसोबत संवाद साधला.

.हेही वाचा 

नाशिकमध्ये डोळ्याच्या साथीचे दररोज पाचशेहून अधिक रुग्ण

हॅकर्सचा कारनामा ! केले अतिरिक्त पोलिस आयुक्तांचे अकाउंट हॅक

कोल्हापूर : बहिरेवाडीतील ए. एस. ट्रेडर्सच्या दोन फरार संचालकांना अटक

Back to top button