हॅकर्सचा कारनामा ! केले अतिरिक्त पोलिस आयुक्तांचे अकाउंट हॅक | पुढारी

हॅकर्सचा कारनामा ! केले अतिरिक्त पोलिस आयुक्तांचे अकाउंट हॅक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ, तसेच सामान्यांची खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. पुणे पोलिस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांनी हॅक केलेल्या खात्यातील मजकुरास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त पोकळे यांनी केले आहे.

शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. समाजमाध्यमात मैत्रीची विनंती पाठवून चोरटे नागरिकांची फसवणूक करतात. सायबर चोरट्यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पोकळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोकळे यांच्या नावाने काही परिचित, नागरिकांनी चोरट्यांनी मैत्रीची विनंती पाठविल्याचे उघडकीस आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोकळे यांनी केले आहे.

हेही वाचा :

पुणे : चेंबरचा धोका; चुके काळजाचा ठोका ! चेंबर्समुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता

पैशासाठी पडतोय नात्यांचा मुडदा; नातेवाईकांचे 400 हून अधिक दावे

 

Back to top button