Tesla चे नवीन CFO भारतीय वंशाचे वैभव तनेजा आहेत तरी कोण?

Tesla चे नवीन CFO भारतीय वंशाचे वैभव तनेजा आहेत तरी कोण?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय वंशाचे अनेक अधिकारी जगातील मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. आता या यादीत वैभव तनेजा यांचाही सामावेश झाला आहे. टेस्ला ही जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एक असून एलन मस्क यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवणारी ही कंपनी आहे.

एलन मस्‍क यांनी आपल्या या खजिन्याची चावी भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांच्याकडे सोपवली आहे. त्‍यांची नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैभव तनेजा यांना टेस्लाचे सीएफओ जॅचरी किरखोर्न यांच्या जागी जबाबदारी देण्यात आली आहे. तर यापूर्वी वैभव यांनी हे लेखा विभागाचे प्रमुख म्‍हणून आपला पदभार सांभाळत होते.

वैभव यांनी 'या' जबाबदाऱ्या पार पाडल्‍या

वैभव हे टेस्लासोबत 2016 पासून काम करत आहे. 2016 मध्ये एलन मस्क यांच्या कंपनीने सोलारसिटी ताब्यात घेतली होती. दरम्यान, वैभव यांना जानेवारी 2021 मध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक बनवण्यात आले होते.

वैभव यांनी केले दोन सीएफओसोबत काम

वैभव यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. टेस्लाच्या त्यांनी कॉर्पोरेट कंट्रोलरची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी सीएफओ पद सोडत असलेल्या जॅचरी किरखोर्न आणि त्यांच्या आधी टेस्लाचे सीएफओ असलेले दीपक आहुजा यांच्यासोबत काम केले आहे. तर टेस्लापूर्वी वैभव हे सोलरसिटीमध्ये उपाध्यक्ष होते.

तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला प्राइसवॉटर हाऊसकूपर्स त्यांनी काम केले. त्यानंतर ते अमेरिकेत पोहोचले. त्यांच्या भारत आणि अमेरिकेतील कंपन्यांतील कामाचा अनुभव १७ वर्षांचा आहे.

हेही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news