एलन मस्क यांच्या Tesla चे नवीन सीएफओ भारतीय वंशाचे वैभव तनेजा | पुढारी

एलन मस्क यांच्या Tesla चे नवीन सीएफओ भारतीय वंशाचे वैभव तनेजा

पुढारी ऑनलाईल डेस्‍क : भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची टेस्लाचे (Tesla ) नवीन मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न यांनी पद सोडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. (Tesla) टेस्लाने सोमवारी शेअर बाजाराला याबाबत माहिती दिली.

किरखोर्न हे कंपनीचे मुख्य लेखा अधिकारी (CAO) म्हणूनही काम करत राहणार आहेत. एलन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीसोबत किरखॉर्नचा 13 वर्षांचा कार्यकाळ हा प्रचंड नफा मिळवून देणार होता, असे कंपनीने सांगितले. (Tesla)

किरखोर्न यांनी पद सोडल्‍यानंतर एका पोस्‍टमध्ये म्‍हटले की, या कंपनीचा एक भाग बनणे हा एक विशेष अनुभव आहे आणि मी 13 वर्षांपूर्वी सामील झाल्यापासून आमच्या कामाचा आम्‍हाला खूप अभिमान आहे, असे त्‍यांनी व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIn वर म्हटले आहे.

एलन मस्क भारत दौऱ्यावर येणार

टेस्ला भविष्यात आपले ऑटो पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स भारतात आणण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेत झालेल्या भेटीदरम्यान एलन मस्क यांनी पुढच्या वर्षी भारताला भेट देणार असल्याचे सांगितले होते.

मोदींची भेट घेतल्यानंतर एलन मस्क यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना भारताची काळजी आहे कारण आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. आम्ही ते करण्याचा विचार करतो आणि हीच ती योग्य वेळ आहे, असे ते म्‍हणाले.

.हेही वाचा 

कोल्हापूर : पुडी माव्याची… विक्री गांजाची!

तांदूळ निर्यातबंदीचे जागतिक परिणाम

पुणे : पदव्या देणार्‍या महाविद्यालयांचे पेव! विनाअनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक दर्जाकडे दुर्लक्ष

Back to top button