राज यांना फोन करीन; पण त्यांनी तो घ्यायला हवा : उद्धव ठाकरे | पुढारी

राज यांना फोन करीन; पण त्यांनी तो घ्यायला हवा : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात राज यांच्याशी बोलायला तयार आहे; पण त्यांनी फोन उचलायला हवा, असे विधान उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान केल्याचे उघड झाले आहे. त्यावर, जे स्वतः कुणाचे फोन उचलत नाहीत त्यांच्याच मनात अशी भीती असू शकते, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भात विधान केले होते. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलेन; पण ते उचलणार असतील तर मी फोन करायला तयार आहे, असे विधान त्यांनी केल्याचे सोमवारी उघड झाले.

दरम्यान, यावर मनसेकडून संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फोन उचलण्यास तयार असतील तर बोलणार, याचा अर्थच मला कळत नाही. राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यातच कसे आले? जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत, त्यांच्याच मनात ही भीती असू शकते.

हेही वाचा : 

Back to top button