Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेतील १०० कि.मी.चा टप्पा गुंतागुंतीचा : ‘इस्रो’ची माहिती | पुढारी

Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेतील १०० कि.मी.चा टप्पा गुंतागुंतीचा : ‘इस्रो’ची माहिती

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चांद्रयान-3 चा प्रवास सुस्थितीत सुरू आहे. हे यान चंद्राच्या कक्षेपासून 100 कि.मी. अंतरावर पोहोचल्यावर मात्र आव्हानात्मक आणि अडचणीचा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.

14 जुलै रोजी चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. चांद्रयानाने पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. या यानाने चंद्रावरील पृष्ठभागाची छायाचित्रेही रविवारी पाठविली आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना सोमनाथ म्हणाले की, सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून 170 कि.मी.×4,313 कि.मी. अंतरावरील कक्षेत पोहोचले आहे. 9 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रापासून 100 कि.मी. अंतरावरील कक्षेत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. हा टप्पा खूप गुंतागुंतीचा असणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button