TESLA New CFO : टेस्ला कंपनीत मोठा बदल! किर्खोर्न यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचा नवा वित्तीय प्रमुख | पुढारी

TESLA New CFO : टेस्ला कंपनीत मोठा बदल! किर्खोर्न यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचा नवा वित्तीय प्रमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्लाचे वित्तीय प्रमुख जैकरी किर्खोर्न (Zachary Kirkhorn) हे आपल्या पदावरुन पायउतार झाल्याची माहिती समोर आली आहे. चार वर्षांनंतर त्यांनी हा पदभार स्विकारलेला होता. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठी वाहन निर्माता कंपनी टेस्लाने आज (दि. ७) ही माहिती दिली आहे. त्यांच्या जागी आता भारतीय वंशाचे वैभव तनेजा (Vaibhav Taneja) यांची नियुक्ती केली. (TESLA New CFO)

किर्खोर्न यांनी टेस्ला कंपनीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केलेली आहेत. ते पदावरुन दूर होत असल्याची अधिकृत माहिती आज (दि. ७) कंपनीने दिली आहे. मात्र त्यांच्या अचानक जाण्यामागे काय कारण आहे याबाबत कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यावेळी कंपनीने असे देखील सांगितले आहे की, या निर्णयानंतर कंपनीची सर्व कामे सुरळीत होईपर्यंत किरखॉर्न हे सध्याचे पूर्ण वर्ष टेस्ला कंपनीतच राहतील. (TESLA New CFO)

किरखॉर्न यांच्या कारकिर्गीदीत, टेस्लाने मास-मार्केटमध्ये 3 कॉम्पॅक्ट सेडान मॉडेल लान्च केलेल्या आहेत. यानंतर कंपनीने $1 ट्रिलियन पेक्षा जास्त बाजार मूल्यांकन इतका नफा पहिल्या तिमाहीत मिळवलेला होता.

किरखॉर्न यांची नियुक्ती 2019 मध्ये करण्यात आलेली होती. त्यावर्षी कंपनीच्या तिमाही निकालांवर चर्चा करण्यासाठी विश्लेषकांशी कॉन्फरन्स झाली होती. या कॉन्फरन्सच्या शेवटी मस्क यांनी आश्चर्यचकितपणे त्यांचे माजी अधिकारी दीपक आहुजा यांच्या निर्गमनाचा खुलासा केला होता.

हेही वाचा

Back to top button