Delhi Fire : दिल्लीतील एम्स रूग्णालयातील एंडोस्कोपी विभागात मोठी आग | पुढारी

Delhi Fire : दिल्लीतील एम्स रूग्णालयातील एंडोस्कोपी विभागात मोठी आग

दिल्ली: पुढारी ऑनलाईन: देशातील सर्वात मोठे दिल्लीतील एम्स रुग्णालयात सोमवारी आग लागल्याने खळबळ उडाली.रुग्णालयातील एंडोस्कोपी कक्षाला ही आग लागली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पंरतु, आगीमुळे रुग्णालयात काही काळ भीतीचे वातावरण होते. आग लागल्याची माहिती मिळताच सर्वांना वार्ड बाहेर सुरक्षित काढण्यात आले. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी रुग्णालयात पोहचून आग आटोक्यात आणली.

घटनेची माहिती मिळताच एम्स संचालकांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी आग लागल्याची सूचना मिळाली.रुग्णालयातील जुन्या बाह्यरूग्ण विभागाच्या दुसऱ्या मजल्यावरील आपात्कालीन वॉर्डच्या वर असलेल्या एंडोस्कोपी कक्षात लागली होती. आगीनंतर कर्मचाऱ्यांनी समयसुचकता दाखवत सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एंडोस्कोपी कक्षात आग लागली. सर्वांना वॉर्डातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ६ बंब दाखल झाले आहेत. एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे. एम्सचे संचालकही घटनास्थळी पोहोचले आहेत. (Delhi Fire)

एम्सच्या सूत्राने सांगितले की, जुन्या ओपीडीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डच्या वर असलेल्या एंडोस्कोपी रूममध्ये आग लागली. आग लागल्यानंतर लगेचच सर्व रुग्णांना खोलीतून बाहेर काढण्यात आले आहे. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा 

Back to top button