Kapil Mishra : कपिल मिश्रा यांच्याकडे दिल्ली भाजप उपाध्यक्षपदाची जबाबदारी

Kapil Mishra : कपिल मिश्रा यांच्याकडे दिल्ली भाजप उपाध्यक्षपदाची जबाबदारी

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाने वादग्रस्त नेते कपिल मिश्रा यांना दिल्ली प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी शनिवारी (दि. ५) ही नियुक्ती केली. सन २०१९ मध्ये कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये सध्या संघटनात्मक फेरबदल सुरु आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस पक्षाने कर्नाटकमधील नेते सी. टी. रवी तसेच आसाममधील नेते खा. दिलीप सैकिया यांना महासचिव पदावरून हटविले होते. दुसरीकडे अलिगड मुसि्लम विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु तारिक मन्सूर यांना उपाध्यक्ष बनविले होते. तर काँग्रेसचे नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल यांना राष्ट्रीय सचिव बनविले होते. दरम्यान गुजरामधील पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीपसिंग वाघेला यांनी पक्षाला रामराम केला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news