

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक अंदाजानुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात होता. दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आज (दि. ५) रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी हे भुकंपाचे धक्के जाणवले.
उत्तर भारतातील अनेक भागात विशेषत: जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमधील हिंदुकुश क्षेत्र हा डोंगराळ भाग आहे. याठिकीणी लोकसंख्येचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच भूकंपाची खोली जास्त असल्याने नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे.
हेही वाचा