महागाईचा 'तडका' : टोमॅटोनंतर बटाटा, कांदेही महागले; आल्यासह इतर मसालेही कडाडले
Commodity Prices | टोमॅटो चार महिन्यांत सहापटीने महागले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या चार महिन्यात टोमॅटो, बटाटे, कांदे यांसह इतर मसाले मोठ्या प्रमाणवर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. CMIE इकॉनॉमिक आऊटलूकने यासंदर्भात सविस्तर आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार गेल्या चार महिन्यात टोमॅटोचे दर जवळपास सहापट वाढले आहेत. तर बटाटे आणि कांद्यांच्या दरात अनुक्रमे २८ आणि १८ टक्के इतकी वाढ झालेली आहे. बिझनेस टुडे या वेबसाईटने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. (Commodity Prices)
टोमॅटो सहापटीने महाग
३१ मार्च २०२३ला टोमॅटोचा दर २३.६० रुपये किलो इतका होता. हा दर ३ ऑगस्ट २०२३ला १४०.१० रुपये प्रतिकिलो इतका आहे. ही वाढ जवळपास ४९४ टक्के किंवा सह पट जास्त आहे, असे या बातमीत म्हटले आहे. तर बटाटाच्या दरात २८ टक्के आणि कांद्याच्या दरात १८ टक्के इतकी वाढ झाली आहे. याशिवाय तुरडाळ, गूळ, उडीद डाळ, भात, मूगडाळ, साखर, दूध यांच्या दरात २ ते १८ टक्के इतकी दरवाढ झालेली आहे.
मसाले महागले Commodity Prices
महत्त्वाचे मसाले असलेले आले १०७ टक्के, लसुण ७६.३० टक्के, हळद ६७.१० टक्केंनी महागली आहे. कोथिंबिरीचा दरही ४.४.टक्केंनी वाढला आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.
खाद्यतेल स्वस्त Commodity Prices
फक्त खाद्यतेलांच्या दरात घसरण झाली असल्याचे चित्र आहे. सूर्यफुल तेल १४ टक्केंनी स्वस्त झाले आहे. तर मोहरची तेल, सोयातेल, पामतेल यांच्या किंमतीही घसरल्या आहेत.
हेही वाचा