Manipur violence; सामूहिक दफनच्या प्रस्तावास स्थगिती

Manipur violence; सामूहिक दफनच्या प्रस्तावास स्थगिती

इम्फाळ, वृत्तसंस्था : मणिपूर हिंसाचारात (Manipur violence) मृत्युमुखी पडलेल्यांवर चुराचंदपूर येथील येथील जागेवर सामूहिक दफन करण्याच्या प्रस्तावावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने 'जैसे थे'चे आदेश दिले आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर गुरुवारी पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 17 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कुकी आणि मैतेई समुदायामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कुकी समुदायातील काहींनी अद्याप मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेले नाहीत. त्यामुळे कुकी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चुराचंदपूर येथील साईटस्वर सामूहिक दफन करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. चुराचंदपूर येथील साईटस्वर 35 मृतदेहांचे दफन करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी मागितली होती. हौलोई खोपी गावातील जागेवर दफन केल्यास पुन्हा हिंसाचार उफाळण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने 'जैसे थे'चे आदेश दिले आहेत. कुकी संघटनेने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सांगितले. 9 ऑगस्ट रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. (Manipur violence)

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिजिनस ट्रिबल लिडर्स फोरम या कुकी समुदायाच्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. सामूहिक दफनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर सामूहिक दफनविधीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा…

logo
Pudhari News
pudhari.news