सीमा हैदरला रामदास आठवलेंच्‍या ‘आरपीआय’ची निवडणूक लढवण्याची ऑफर! | पुढारी

सीमा हैदरला रामदास आठवलेंच्‍या 'आरपीआय'ची निवडणूक लढवण्याची ऑफर!

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा :  ‘पब्‍जी’ प्रियकरासाठी चार मुलांसह पाकिस्तानमधून अवैधरित्‍या भारतात आलेली सीमा हैदर सध्‍या चर्चेचा विषय ठरली आहे. सध्‍या ती प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत आहे. ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोपही झाला होता. आता सीमा हैदर आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकीची निवडणूक लढवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एनडीए’चा मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सीमा हैदरला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्‍यात आली आहे. तिने ही ऑफर स्वीकारली आहे. (Republican party offer seema Haidar)

Republican party offer seema Haidar: … तर सीमा हैदर ‘आरपीआय’ प्रवक्ता

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्‍या एका नेत्‍याने सांगितले की, सीमा हैदर यांना महिला संघटनेच्या अध्यक्षा बनवता येऊ शकते. त्‍यांचे वक्तृत्त्व चांगले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाचे प्रवक्तेपदही दिले जाऊ शकते. सुरक्षा संस्‍थांनी अद्याप सीमा हैदर यांना क्लीन चिट दिलेली नाही. त्‍यांना क्लीन चिट मिळाल्‍यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. (Republican party offer seema Haidar)

सीमाला चित्रपटाचीही ऑफर

यापूर्वी एनी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसच्या टीमने सीमा हैदर यांची भेट घेतली होती. चित्रपट दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमा हैदरची ऑडिशन दिली. टेलर मर्डर स्टोरीमध्ये सीमा हैदर भारतीय बाजूच्या रॉ एजंटची भूमिका साकारणार असल्‍याचे वृत्त होते.

सीमा गुलाम हैदर ही पाकिस्तानी महिला आहे. ती मूळची कराची शहरातील आहे. चार मुलांची आई असलेली सीमा हैदर वयाच्‍या ३० व्या वर्षी PUBG खेळताना भारतीय तरुण सचिन मीना याच्‍या ऑनलाइनच्या प्रेमात पडली. त्यांचे प्रेम बहरले. सीमा सचिनला भेटण्‍यासाठी नेपाळमार्गे आपल्‍य चार मुलांसह दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथे पोहोचली. अवैधरित्‍या भारतात राहणार्‍या सीमाची उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्‍तचर विभागाने चौकशी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button