Siddaramaiah Meets PM Modi : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी घेतली पीएम मोदींची भेट

Siddaramaiah Meets PM Modi : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Siddaramaiah Meets PM Modi : दक्षिणेतून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करीत काँग्रेसच्या कर्नाटक विजयाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. भेटी दरम्यान सिद्धारमय्या यांनी पंतप्रधानांना राज्यातील पारंपरिक हत्तीची कलाकृती भेटस्वरुपात दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जवाबदारी स्वीकारल्यानंतर सिद्धारमय्या यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी कर्नाटकची निशुल्क तांदूळ वितरण योजना 'अन्न भाग्य योजने'साठी केंद्राकडून तांदूळ पुरवठा करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दसऱ्या निमित्त कर्नाटकमध्ये 'एअर शो'चे आयोजन करण्याची विनंती सिद्धारमय्या यांनी केली. यापूर्वी बुधवारी सिद्धारमय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. कर्नाटक भवन येथे शेतकरी नेते राकेश टिकेत आणि डॉ. सुनीलम यांची भेट घेत सिद्धारमय्या यांनी भेट घेत शेतकऱ्यांचे विविध मुद्दे आणि समस्यांसंबंधी चर्चा केली होती.

आणखी वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news