Tesla : मोठी बातमी ! 'टेस्ला' होणार पुणेकर ! पुण्यातील ऑफिससाठी कंपनीने मोजले इतके लाख | पुढारी

Tesla : मोठी बातमी ! 'टेस्ला' होणार पुणेकर ! पुण्यातील ऑफिससाठी कंपनीने मोजले इतके लाख

पुढारी ऑनलाईन :  टेस्ला ही कंपनीजगभरात स्वत:ची खास क्रेझ निर्माण केल्यानंतर आता भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात शिरकाव करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातून भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात येण्याचा निर्णय टेस्लाने घेतला आहे. पुण्यातील विमाननगर येथील पंचशील बिझनेस पार्कमध्ये टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय सुरू होणार आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार ही जागा कंपनीने टेबलस्पेस टेक्नॉलॉजीसोबत झालेल्या कराराने पाच वर्षं भाडेतत्वावर घेतली आहे.  5,580 चौरस फुट इतका या कार्यालयाचा विस्तार आहे. तर यासाठी कंपनीला 11.65 लाख रुपये मासिक भाडे असेल. 1 ऑक्टोबरपासून हा करार लागू होईल. 60 महिन्यांसाठी कंपनीने तब्बल 34.95 लाख डिपॉजिट भरले आहे. टेस्लाचा    सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी मोदींसोबत झालेल्या भेटीत टेस्ला भारतीय इलेक्ट्रॉनिक वाहन बाजारात येण्यासाठी उत्सुक असल्याचेही सांगितले होते.

उत्पादन आणि संशोधनासाठी भारत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं विधान इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अलीकडेच प्रसिद्ध वृत्तसेवेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते.

हेही वाचा :

Gyanvapi Case | वाराणसीतील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणास अलाहाबाद हायकोर्टाची परवानगी

Andaman and Nicobar : अंदमान आणि निकोबार पुन्हा हादरले

Back to top button