पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई, कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित राज्यात शनिवारपासून (दि. 29) पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेले आठ दिवस राज्यातील सर्वच भागांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्याने सरासरी गाठली व 17 टक्के अधिक पावसाची नोंद 28 जुलै रोजीच झाली. आगामी पाच दिवस मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याबाबत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, 3 ऑगस्टपर्यंत पाऊस असाच चालू राहणार आहे.
मात्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात जोर कमी होत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरात पाऊस वाढत आहे. तसेच उत्तर भारतात हरियाणा तेथे पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने त्या भागात पाऊस वाढत आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवरही जोरदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या स्थितीमुळे आगामी पाच दिवस मध्य भारतात वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे.
3 ऑगस्टपर्यंत अलर्ट
कोकण : मुसळधार
मध्य महाराष्ट्र (घाट) : मुसळधार
विदर्भ : मध्यम
मराठवाडा : मध्यम पाऊस
हेही वाचा :