Orange Alert : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट; मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा | पुढारी

Orange Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट; मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्‍यान, भारतीय हवामान विभागाने  उद्या (दि. २३) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. या जिल्‍ह्यांमध्‍ये मुसळधार व अति मुसळधार पावसाचा शक्‍यता असल्‍याचे हवामान विभागाने म्‍हटले आहे.

राज्यातही कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा मुसळधार पाऊस सुरु आहे. गेले दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट होता.  जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज IMD कडून उद्या (दि. २३ रविवार) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार व अति मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा

 

 

 

Back to top button