Indian Economy per Capita Income : २०३० पर्यंत देशाच्या दरडोई उत्पन्नात ७०% वाढ; गुजरात आणि महाराष्ट्राची आघाडी | पुढारी

Indian Economy per Capita Income : २०३० पर्यंत देशाच्या दरडोई उत्पन्नात ७०% वाढ; गुजरात आणि महाराष्ट्राची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगाने सुरू असून २०३० पर्यंत भारताच्या दरडोई उत्पन्नात ७०टक्केंची वाढ होणार आहे, असे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या अहवालात म्हटले आहे. राज्यांचा विचार केला तर गुजरात क्रमांक एक वर तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे या अहवालात म्हटले आहे. भारताचे सध्या दरडोई उत्पन्न २,४५० अमेरिकन डॉलर इतके आहे. ते २०३०पर्यंत ४ हजार इतके होईल असे या अहवालात म्हटले आहे. म्हणजे २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ६ ट्रिलियन डॉलरची झालेली असेल. त्यातून भारत मिडल इनकम इकॉनॉमीमध्ये गणला जाईल. (Indian Economy per Capita Income)

बाहेरील देशांशी भारताचा असणारा व्यापार हा २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता असून त्यातून भारताच्या दरडोई उत्पन्नात ही मोठी पडेल, असे या अहवालात म्हटले आहे. सध्या भारताचा परदेश व्यापार हा १.२ ट्रिलियन डॉलर इतका आहे, तो २०३०पर्यंत २.१ ट्रलियन डॉलर इतका झालेला असेल. तर देशांतर्गत व्यापारात भर पडून तो ३.४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेला असेल. (Indian Economy per Capita Income)

राज्यनिहाय विचार केला तर गुजरात क्रमांक एकचे राज्य असेल, त्या खालोखाल महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक असेल. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचे दरडोई उत्पन्न दुप्पट झालेले असेल. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकवर असेल, असे म्हटले होते. सध्या जपान तिसऱ्या क्रमांकवर असून जर्मनी चौथ्या क्रमांकवर आहे. तर भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. (Indian Economy per Capita Income)

हेही वाचंलत का?

Back to top button