LPG Price : दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडर दरात कपात; जाणून घ्या नवे दर | पुढारी

LPG Price : दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडर दरात कपात; जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. आजपासून १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ९९.७५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्ली १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १६८० रुपये असणार आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच गॅसच्या वाढत्या किमतीपासून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कपात झाली आहे. आजपासून (दि.१) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ९९.७५ रूपयांनी कमी केली. परंतु घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

तेल कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांनी वाढ केली होती. या वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १,७८० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होते. यामध्ये सर्वाधिक परिणाम व्यावसायिक गॅस सिलिंडरवर दिसून आला. या वर्षी मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति युनिट ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तथापि, मे महिन्यात त्यांच्या किमती १७१.५० रुपयांनी कमी झाल्या.

हेही वाचा : 

Back to top button