Bank holidays in August 2023 | ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँकांना सुट्टी; जाणून घ्या लिस्ट | पुढारी

Bank holidays in August 2023 | ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँकांना सुट्टी; जाणून घ्या लिस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्ट २०२३ मध्ये १४ दिवस बँका बंद असणार आहेत. यापैकी सर्व रविवारी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. नागरिकांना बँकेतील कामांचे नियोजन करता यावे, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने सुट्ट्या कशा प्रकारे देण्यात आल्या आहेत? याची माहिती दिली आहे. त्यामुळे बँकेतील कामे लवकरात लवकर करुन घ्यावी लागणार आहेत. (Bank holidays in August 2023)

१५ दिवसांतील ८ सुट्ट्या या पुढील कारणांमुळे देण्यात आल्या आहेत. आठ बँक सुट्ट्यांमध्ये तेंडोंग ल्हो रम फट, भारतीय स्वातंत्र्य दिन, पारसी नववर्ष, श्रीमंत शंकरदेवाची तिथी, पहिला ओणम, तिरुवोनम, रक्षा बंधन, रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोल इत्यादी सण, उत्सव आणि तिथींचा समावेश आहे. देशातील अनेक राज्यांमधील व्यावसायिक आणि खासगी बँका या दिवशी बंद राहतील. (Bank holidays in August 2023)

ऑगस्ट २०२३ च्या सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे –

 

८ ऑगस्ट – तेंडोंग ल्हो रम फट (Tendong Lho Ram Faat) : सिक्कीममध्ये बँक हॉलिडे

१५ ऑगस्ट (भारतीय स्वातंत्र्य दिन) : संपूर्ण भारतभर बँकांना सुट्टी

१६ ऑगस्ट (पारशी नववर्ष- शहेनशाही) : बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी

१८ ऑगस्ट (श्रीमंत शंकरदेवाची तिथी) : गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्टी

२८ ऑगस्ट (पहिला ओणम) : कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकांना सुट्टी

२९ ऑगस्ट (थिरुवोनम) : कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकांना सुट्टी

३० ऑगस्ट (राखी पौर्णिमा) : जयपूर आणि शिमल्यात बँकांना सुट्टी

३१ ऑगस्ट (रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोल) : डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक सुट्टी. (Bank holidays in August 2023)

या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला बँकिंग व्यवहार करायचे असल्यास, तुम्ही ते मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि व्हॉट्सअॅप बँकिंगद्वारे करू शकता. मात्र, तुम्ही या सेवांमध्ये अगोदर नोंदणी केली असल्याची किंवा अशा सुविधा वापरण्यासाठी प्रक्रिया केली आहे का? याची माहिती घ्या. (Bank holidays in August 2023)

हेही वाचलंत का?

Back to top button