भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा | पुढारी

भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) सोमवारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (dk shivakumar) यांना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने डीके शिवकुमार यांच्याविरोधातील सीबीआय तपासाला अंतरिम स्थगिती दिली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी डीके शिवकुमार (dk shivakumar) यांच्याविरुद्ध सीबीआयच्या तपासावर अंतरिम स्थगिती दिली होती.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या (high court) निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. सीबीआयच्या (CBI) वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. डीके शिवकुमार यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले.

उच्च न्यायालयाच्या (high court) निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही आणि सीबीआयची (cbi) इच्छा असेल तर उच्च न्यायालयाला (high court) विनंती करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. २०१७ मध्ये आयकर विभागाने डीके शिवकुमार यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. याप्रकरणी ईडीनेही शिवकुमारविरोधात (dk shivkumar) चौकशी सुरू केली होती.

Back to top button