Parliament Monsoon Session : मणिपूर मुद्यावरून लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब  | पुढारी

Parliament Monsoon Session : मणिपूर मुद्यावरून लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधकांच्या निदर्शनेनंतर लोकसभेचे कामकाज आज (दि.३१) दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. (Parliament Monsoon Session )

सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरु झाले. यावेळी लाेकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज पाहण्‍यासाठी आलेल्‍या मालावी संसदीय शिष्टमंडळाचे स्‍वागत केले. त्यांचे भाषण पूर्ण हाेताच विरोधी पक्षाचे सदस्यांनी मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांच्या वक्तव्याची मागणी केली. तसेच फलक दाखवत सरकारविरोधात घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये आले. याकडे दुर्लक्ष करत लाेकसभा अध्‍यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला.

घोषणाबाजी आणि निदर्शने दरम्यान शिक्षण आणि अर्थ मंत्रालयाशी संबंधित दोन प्रश्न चर्चेसाठी घेण्यात आले. विरोध सुरूच असताना सभापतींनी विरोधी सदस्यांना आपल्या जागेवर जाऊन कामकाजात भाग घेण्याचे आवाहन केले. तरीही विराेधी पक्षांच्‍या सदस्‍यांनी गदाराेळ सुरुच ठेवला. अखेर १५ मिनिटांच्या कामकाजानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी दाेन वाजेपर्यंत तहकूब केले.

हेही वाचा 

Back to top button