Jaipur-Mumbai Train Firing : आधी सहकाऱ्याला संपवले नंतर प्रवाशांना बंदुकीच्या धाकावर धरले, जयपूर- मुंबई एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? | पुढारी

Jaipur-Mumbai Train Firing : आधी सहकाऱ्याला संपवले नंतर प्रवाशांना बंदुकीच्या धाकावर धरले, जयपूर- मुंबई एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर धावत्या जयपूर – मुंबई रेल्वेमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला. त्याने एक आरपीएफ जवान आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. यात चारही जणांचा मृत्यू झाला. दहिसर ते मीरारोड दरम्यान हा थरार घडला.

नेमक काय घडलं?

जयपूर ते मुंबई रेल्वेमध्ये दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडली. आरपीएफ जवानांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचे समजते. १२९५६ जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एस्कॉर्टिंग स्टाफ कॉन्स्टेबल चेतन कुमार याने त्याचा सहकारी एस्कॉर्ट इनचार्ज ASI टिका राम यांच्यावर गोळी झाडली. पहाटे ५.२३ च्या सुमारास बी ५ कोचमध्ये ही घटना घडली. चेतन कुमारने आपल्या सहकाऱ्याला गोळ्या घालून सुरुवातीला प्रवाशांना बंदुकीच्या धाकावर धरले. यादरम्यान त्याने तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या आणि दहिसरजवळ चैन पुलिग करून तो पळून गेला. आरपीएफ भाईंदरने शस्त्रासह त्याला अटक केली. या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली असून या गोळीबाराचे नेमके कारण अदयाप समजलेले नाही.

हेही वाचा : 

Back to top button