Two supermoons in August | ऑगस्टमध्ये दोनवेळा होणार सुपरमूनचे दर्शन; एकाच महिन्यात २ पौर्णिमा | पुढारी

Two supermoons in August | ऑगस्टमध्ये दोनवेळा होणार सुपरमूनचे दर्शन; एकाच महिन्यात २ पौर्णिमा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्ट महिन्यात दोनवेळा सुपरमूनचे दर्शन होणार आहे. यामध्ये १ ऑगस्टला पोर्णिमेदिवशी पहिल्यांदा सुपरमून दिसणार आहे. तर ऑगस्टमध्येच ३० तारखेला दुसऱ्यांदा सूपरमून दिसणार आहे. या दोन्ही वेळा चंद्र सर्वात मोठा आणि निळ्या रंगाचा दिसणार आहे, अशी माहिती अमेरिकेची तराळ संशोधन संस्था नासाने दिली आहे, असे ‘हिंदुस्थान‘ या वृत्तवाहिनीने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.

नासाच्या मतानुसार, मंगळवारी (१ ऑगस्ट) आकाशातील चंद्र नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि चमकणारा दिसेल. या दोन्ही दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून अधिक जवळ असणार आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३,५७,५३० किमी (२,२२,१५९ मैल) इतके असणार आहे. याच महिन्यात सुपरमून दिसण्याची दुसरी खगोलीय घटना ३० ऑगस्टला होणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्र ३,५७,३४४ किमी (२,२२,०४३) इतक्या जवळ असणार आहे. ३० ऑगस्टला या महिन्यातील दुसरी पौर्णिमा असणार आहे.

या खगोलिय घटनेसंदर्भात माहिती देताना नासाचे खगोल शास्त्रज्ञ फ्रेड एस्पेनक यांनी सांगितले की, यापूर्वी २०१८ मध्ये एकाच महिन्यात दोनवेळा पूर्ण सुपरमून दिसण्याची घटना घडली होती. तर इटलीचे खगोलशास्त्रज्ञ जियानलुका मासी यांच्या मते यानंतर अशीच घटना २०३७ मध्ये घडणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button