अहमदाबाद ; पुढारी ऑनलाईन गुजरातच्या अहमदाबादमधील एका रूग्णालयाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागली. बेसमेंटमध्ये लावण्यात आलेल्या ३० हून अधिक गाड्या या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. अग्निशमनच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अहमदाबादच्या शाही बाग स्थित राजस्थान रूग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आज सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी मोठी आहे की, यामुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याने यामुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरले आहेत. दरम्यान रूग्णालयातील ८० रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
राजस्थान रूग्णालयाच्या बेसमेंटमध्ये जेंव्हा आग लागली तेंव्हा रूग्णालयात १०० रूग्ण भरती झाले होते. त्यांना तात्काळ दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या ३१ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान रूग्णालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा :