भारतीयांच्या ग्रीन कार्डचा विषय अमेरिकेत १९५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे. अमेरिकेत वास्तव्य करीत असलेल्या १५० देशांमधील नागरिकांना भारतीयांसारख्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. या पार्श्वभूमीवर ग्रीन कार्डविषयी थोडक्यात माहिती…
अमेरिकेत कायमस्वरूपी विस्थापित झालेल्यांना ग्रीन कार्ड दिले जाते. ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेत वास्तव्य करण्याचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळते. कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी ग्रीन कार्ड ठोस पुरावा मानला जातो.
गेल्या १९५ वर्षांपासून भारतीयांच्या ग्रीन कार्डचा विषय व्हाईट हाऊसमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे अमेरिकन खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे भारतीयांच्या ग्रीन कार्डधारकांचा विषय मार्गी लावण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली आहे. खासदार राजा कृष्णमूर्ती आणि खासदार लॅरी बुकशॉन यांच्या नेतृत्वाखाली ५६ सदस्यांनी बायडेन यांना याबाबत पत्र लिहिले आहे.
तंत्रज्ञान उद्योगामध्ये भारतीयांची कामगिरी अनमोल आहे. ग्रीन कार्ड अभावी त्यांना अनेक अडचणींचा मुकाबला करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेत नोकरीसाठी स्थायिक होणाऱ्या नागरिकांना हा व्हिसा दिला जातो. अमेरिकेत अनेक कंपन्यांमध्ये भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंते नोकरी करीत आहेत. अमेरिकेच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
अमेरिकन कंपन्यांना भारतीय तंत्रज्ञांची उणीव भासत आहे. भारतातून त्यांना हजारोंच्या संख्येने तंत्रज्ञानाची गरज भासत आहे. त्यामुळे कंपन्यांनी या व्हिसाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एच-१बी व्हिसाची संख्याही वाढविण्यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक सादर करण्यात येणार आहे.