Global Tiger Day | जगातील ७५ टक्के वाघ भारतात; मध्य प्रदेशात सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९७३ मध्ये भारत सरकारने 'प्रोजेक्ट टायगर' हा एक महत्वकांक्षी प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश वाघांचे रक्षण करणे आणि जैवविविधता जतन करणे होता. गेल्या ५० वर्षांत भारताने व्याघ्र संवर्धनात लक्षणीय प्रगती करत प्रोजेक्ट टायगरने मोठे यश मिळवले. जागतिक स्तरावर विचार केल्यास सर्वाधिक जगातील तुलनेत ७५ टक्के वाघ भारतात आहेत. (Global Tiger Day) मध्य प्रदेशात सर्वाधिक ७८५ वाघ आहेत, त्यानंतर कर्नाटकात ५६३ आणि उत्तराखंड ५६० आणि महाराष्ट्रात ४४४ वाघ आहेत.

सध्या जगातील ७५ टक्के वाघांची संख्या भारतात (Global Tiger Day)

१९७० च्या दशकात व्याघ्र संवर्धनाचा पहिला टप्पा वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यावर आणि वाघांसाठी आणि उष्णकटिबंधीय जंगलांसाठी संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्यावर केंद्रित होता. तथापि, १९८० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे वाघांच्या संख्येत घट झाली. यानंतर सरकारने २००५ मध्ये दुसरा टप्पा सुरू केला. कायद्याची अंमलबजावणी आणि वाघांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी वैज्ञानिक देखरेखीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. (Global Tiger Day)

९ एप्रिल २०२२ रोजी, म्हैसूर येथे वाघ प्रकल्पाच्या ५० वर्षांच्या उत्सवादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघांची किमान ३१६७ लोकसंख्या घोषित केली होती. मध्य भारत आणि शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या मैदानात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये वाघांची संख्या जास्त आहे. मिझोराम, नागालँड, झारखंड, गोवा, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसह काही राज्यांत लहान वाघांची संख्या चिंताजनक आहे. (Global Tiger Day)

व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या (Global Tiger Day)

कॉर्बेट (२६०), बांदीपूर (१५०), नागरहोल (१४१), बांधवगड (१३५), दुधवा (१३५), मुदुमलाई (११४), कान्हा (१०५), काझीरंगा (१०४), सुंदरबन (१००), ताडोबा (९७), सत्यमंगलम (८५), आणि पेंच-एमपी (७७). (Global Tiger Day)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news