छत्रपती संभाजीनगर : बिबट्या गोठ्यात शिरताच शेतकऱ्याने लावले दार; बकऱ्याचा फडशा पाडून बिबट्या पसार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : बिबट्या गोठ्यात शिरताच शेतकऱ्याने लावले दार; बकऱ्याचा फडशा पाडून बिबट्या पसार

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव येथील शेतवस्तीवरील एका बक-याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडला. बिबट्या बकऱ्यावर ताव मारत असताना शेतकऱ्यांनी गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकले. यामुळे बिबट्याला बघण्यासाठी शेतकरी व नागरीकांनी मोठी गर्दी केली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दोन तासानंतर घटनास्थळी आले, परंतु त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी काहीच उपाययोजना न केल्याने चार तासानंतर रात्री २ वाजता बिबट्या जाळीच्या खालुन निघून गेला. यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रथम पिंपरी शिवारात २८ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने राऊसाहेब पवार याच्या वस्तीवर कुत्र्याला धरले असता, वस्तीवरील शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यावर आवाजामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडून ओढ्याकडे पळ काढला. तो नरहरी रांजणगाव शिवारातील सुकदेव म्हस्के यांच्या शेतात बकऱ्यासाठी बांधलेल्या जाळीच्या गोठ्यात उघड्या असलेल्या दरवाजातून आत घुसला. यावेळी बकऱ्याच्या आवाजाने म्हस्के यांनी पाहिले असता, त्‍यांना बिबट्याला पाहिले व मोठ्या हिंमतीने त्यांनी गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकले.

गोठ्यात १० ते १५ बकऱ्या होत्‍या. बिबट्याने त्यातील एका बकरीचा बिबट्याने फडशा पाडून ताव मारायला सुरुवात केली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दोन तासानंतर घटनास्थळी आले, परंतु त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी काहीच उपाययोजना न करता उपस्थित जमावाला पोलिसांच्या मदतीने हाकलून लावले. शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडून घेऊन जाण्याची विनंती केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न न करता बघ्यांची भूमीका घेत नागरिकांना हाकलून लावले. चार तासानंतर रात्री २ वाजता बिबट्या जाळीच्या खालून निघून गेला. या घटनेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिका-यांना धारेवर धरले होते.

बकऱ्याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला शेतकऱ्यांनी कोंडले. बिबट्याने बकरीवर ताव मारला, बिबट्याला बघण्यासाठी शेतकऱ्यांची व बघ्यांची खुप मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जमावाला पोलिसांच्या मदतीने हाकलून लावले. त्या गरबडीत बिबट्या जाळीच्या खालुन निघून गेला. यामुळे शेतकऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा : 

Back to top button