Rahul Gandhi | "राहुलसाठी मुलगी शोधा", सोनिया गांधींचे मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ | पुढारी

Rahul Gandhi | "राहुलसाठी मुलगी शोधा", सोनिया गांधींचे मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा केला जातो. याधी स्वतः राहुल गांधी यांनी, चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार असल्याचे उत्तर दिले आहे. ते नेहमीच सर्वसामान्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ स्वतः राहुल गांधी यांनी ट्विटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधी यांची बहीण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) महिला शेतकऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसतात. यात प्रत्येकजण थट्टामस्करी करताना दिसतात. राहुल गांधी यांनी ट्विटर हँडलवर या हलक्याफुलक्या गप्पांची एक झलक शेअर केली. ज्यात एका महिला शेतकऱ्याने सोनिया गांधींना विचारले की, “राहुलजी यांचे आता लग्न लावून द्या.” त्यावर सोनिया गांधींनी उत्तर दिले की, “तुम्ही मुलगी शोधा.” या उत्तराने उपस्थित महिलांमध्ये एकच हस्सकल्लोळ उडाला.

राहुल गांधी यांचे ट्विट

अन्न, महिला सबलीकरण आणि जीएसटी हे या संवादाचे प्रमुख मुद्दे होते. राहुल यांनी त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्या दिल्लीतील घरी महिला शेतकर्‍यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यांना यावेळी सांगितले की सरकारने त्यांची घरे काढून घेतली आहेत.

राहुल (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही खास पाहुण्यांसोबत मां, प्रियांका आणि माझ्यासाठी एक संस्मरणीय दिवस होता! सोनीपतच्या शेतकरी बहिणींचे दिल्ली दर्शन, त्यांच्यासोबत घरचे जेवण आणि अनेक साऱ्या मजेदार गोष्टी. यावेळी देशी तूप, गोड लस्सी, घरी बनवलेले लोणचे आणि भरपूर प्रेम या अनमोल भेटवस्तू मिळाल्या.

महिला शेतकऱ्यांनी १६ जुलै रोजी गांधी कुटुंबीयांची भेट घेतली होती. पण आज हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओत महिला शेतकऱ्यांचा एक गट दिल्ली भेटीत उत्साहात दिसत आहे आणि त्यातील काही महिला “चलो दिल्ली, चलो” असा नारा देताना दिसतात. या संवादादरम्यान महिलांनी महागाई, औषधांच्या वाढत्या किंमती, खते, वीज आणि जीएसटीच्या मुद्यावर गांधी कुटुंबाकडे तक्रारी केल्या.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये प्रियांका असे म्हणताना ऐकू येते की, “तो खूप गोड दिसतोय, होय ना? तो सर्वात खोडकर आहे आणि मला ओरडा पडेल.” व्हिडिओच्या शेवटी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी शेतकऱ्यांसोबत थिरकताना दिसतात.

हे ही वाचा :

Back to top button