Rahul Gandhi Truck Ride : राहुल गांधींची 'ट्रक यात्रा', Viral Video चर्चेत | पुढारी

Rahul Gandhi Truck Ride : राहुल गांधींची 'ट्रक यात्रा', Viral Video चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी पुन्‍हा एकदा चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी आले आहेत. आता अंबालामध्‍ये राहुल गांधी यांचा ट्रकमधील नवा लूक समोर आला असून, त्‍यांनी ट्रकमधून केलेला प्रवासाचा Video Viral झाला आहे. ( Rahul Gandhi Truck Ride )

अंबालामध्ये राहुल गांधी यांच्‍या नव्‍या लूकने सार्‍यांच अचंबित केले. ते अचानक ट्रकमध्ये बसून अंबाला येथे पोहोचले. त्यांनी अंबाला शहरातील श्री मंजीसाहेब गुरुद्वारा येथे ट्रक थांबवला. श्री मंजीसाहेब गुरुद्वारात ते नतमस्‍तक झाले. यानंतर ते काही काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्‍यांनी संवाद साधला. यानंतर ट्रकमध्ये बसून ते हिमाचल प्रदेशला गेले.

राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास केल्‍याचे कारण काँग्रेसच्‍या वतीने सांगण्‍यात आलेले नाही. मात्र त्‍यांनी केलेल्‍या ट्रक प्रवासाचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. या प्रवासात प्रवास राहुल गांधी यांनी ट्रक चालकाशी चर्चा केली. त्‍यांच्‍या समस्‍यांविषयी माहिती घेतल्‍याचे काँग्रेसच्‍या सूत्रांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button