Manipur Viral Video Case: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची CBI करणार चौकशी | पुढारी

Manipur Viral Video Case: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची CBI करणार चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur Viral Video Case : गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. ज्या प्रकारे दोन महिलांची विवस्त्र करून रस्त्यावरून धिंड काढण्यात आली, त्यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. हा व्हिडिओ व्हायरल झानंतर राज्यात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. आता या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गृह मंत्रालयाने तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

याशिवाय मणिपूरला 35,000 सुरक्षा कर्मचार्‍यांची अतिरिक्त फौज पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुकी आणि मैतेई समुदायांमधील वादग्रस्त भागात बफर झोन तयार करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर काटेरी तारांच्या माध्यमातून सीमेवरील सुरक्षा अधिक सज्ज करण्याची चर्चा आहे.

दरम्यान, सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हेही समोर आले आहे की, ज्या मोबाईलवरून हा व्हायरल व्हिडिओ शूट करण्यात आला होता तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच व्हिडिओ शूट करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. कुकी आणि मैतेई समुदायाच्या सदस्यांशी केंद्र सरकारने चर्चा केल्याची माहितीही सरकारी सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक समाजाशी चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत.

Back to top button