Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ६०० अंकांनी गडगडला! ‘ऑटो’ला फटका, फार्मा, रियल्टी तेजीत, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन : सकारात्मक सुरुवात करुनही आज गुरुवारी शेअर बाजार कोसळला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ६०० अंकांनी घसरून ६६ हजारांपर्यंत खाली आला. तर निफ्टी (Nifty) १९,६५० च्या खाली राहिला. सुरुवातीला ६६,९८४ अंकांपर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्सची आजच्या दिवसांतील उच्चांकावरून झालेली घसरण ही सुमारे ९०० अंकांची राहिली. त्यानंतर सेन्सेक्स ४४० अंकांनी घसरून ६६,२६६ वर बंद झाला. तर निफ्टी ११८ अंकांच्या घसरणीसह १९,६५९ वर स्थिरावला.

बाजारात आज वरच्या स्तरावरून जोरदार विक्री दिसून आली. एफएमसीजी आणि ऑटो सेक्टरमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. फार्मा स्टॉक्स तेजीत राहिले. (Stock Market Closing Bell) क्षेत्रीयमध्ये ऑटो, ऑइल अँड गॅस, बँक आणि एफएमसीजी निर्देशांक प्रत्येकी ०.५ ते १ टक्क्यांनी घसरले. तर फार्मा निर्देशांक ३ टक्क्यांनी आणि रियल्टी निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंटने वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज गुरुवारी तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ६६,९०० वर गेला. तर निफ्टी १९,८५२ वर होता. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरले.

'हे' ठरले टाॅप लूजर्स

सेन्सेक्स आज ६६,८३४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,९८४ अंकांपर्यंत वाढला. त्यानंतर तो ६६ हजारांवर आला. सेन्सेक्स एम अँड एमचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर ६ टक्क्यांहून अधिक घसरला. टेक महिंद्राचा शेअरही ३ टक्क्यांनी घसरून १,१०२ रुपयांवर आला. नेस्ले इंडिया, आयटीसी, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स हे शेअर्स घसरले. दरम्यान, सन फार्मा, भारती एअरटेल, टाटा मोटर्स हे शेअर्स वाढले. (Stock Market Closing Bell)

निफ्टीवर M&M, टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, बीपीसीएल आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचे शेअर्स घसरले. तर सिप्ला, सन फार्मा, डिव्हिस लॅब्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज यांचे शेअर्स तेजीत राहिले.

एम अँड एमला मोठा फटका

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) चे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने खासगी कर्ज देणाऱ्या आरबीएल बँकेतील भागभांडवल खरेदी केले आहे. महिंद्राकडून सांगण्यात आले आहे की त्यांनी RBL मधील ३.५३ टक्के भागभांडवल ४१७ कोटी रुपयांना खरेदी घेतले आहे. या पार्श्वभूमीवर एम अँड एमचा शेअर (Shares of Mahindra & Mahindra Ltd) आज ६.९६ टक्‍क्‍यांनी गडगडून १,४३८ रुपयांवर आला. तसेच आरबीएल बँकेचा शेअरही २.५५ टक्क्यांनी घसरला. एकूणच आज बँकिग स्टॉक्समध्ये घसरण झाली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news