APJ Abdul Kalam death anniversary: भारताचे ‘मिसाईल मॅन’ एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | पुढारी

APJ Abdul Kalam death anniversary: भारताचे 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांची आज, २७ जुलै रोजी स्मृतिदिन आहे. (APJ Abdul Kalam death anniversary) कलाम एक महान विचारवंत, लेखक आणि शास्त्रज्ञ (Scientist) होते. राष्ट्रपती कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. २७ जुलै २०१५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. (APJ Abdul Kalam death anniversary) तरुणांमध्ये उत्साह भरणारे एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार सर्वांसाठी आदर्शवत आहेत.

१) एखाद्याला हरवणे खूप सोप्पे आहे, पण त्याला जिंकणे खूप अवघड असते.

२) मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये, पण मी माझे हात गरजूला मदत म्हणून देऊ शकतो.

३) सुंदरता ही मनात असते तोंडावर नव्हे

४) आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असतील तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.

५) सक्रिय व्हा! जबाबदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्यदुसऱ्याच्या हवाली करत आहात.

६) तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.

७)स्वप्र ते नसते जे आपण झोपल्यावर आपल्याला दिसुन येते. स्वप्र ते असते जे आपणास शांतपणे झोपू देत नाही.

८)जेव्हा पावसाचा आरंभ होत असतो तेव्हा इतर पक्षी आपापल्या घरट्यात आश्रयासाठी जातना्‌ पण गरूड हा ह्याच पावसापासून स्वताला वाचवायला ढगांवरून उंच भरारी घेत असतो.

९) आपल्या जीवणात येणाऱ्या अडीअडचणी वाईट प्रसंग यांनीच आपल्यातील आत्मबळात वाढ होते.

१०) जीवनात कितीही संकटे आली तरी देखील त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवायला हवी.

 

Back to top button