Stock Market Updates | सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, ‘हे’ १० शेअर्स तेजीत, जाणून घ्या बाजाराची चाल | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'हे' १० शेअर्स तेजीत, जाणून घ्या बाजाराची चाल

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने आज बुधवारी सकारात्मक सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून ६६,७७३ वर पोहोचला. तर निफ्टी १९,८०० जवळ पोहोचला. ऑटो, रियल्टी, PSU बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदी दिसून येत आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर आज एलटी कंपनीचा ( LT) शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर ३.८४ टक्क्यांनी वाढून २,६६० रुपयांवर व्यवहार करत आहे. टाटा मोटर्सचा शेअर २.३६ टक्के वाढून ६५४ रुपयांवर पोहोचला आहे. पॉवर ग्रिड, आयटीसी, रिलायन्स, सन फार्मा, टाटा स्टील, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्सही वधारले आहेत. तर एम अॅंएम अँड एम, एचडीएफसी हे शेअर्स घसरले आहेत.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी आणि मुख्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी वाढले आहेत. बँका, आयटी, मेटल, फार्मा, रियल्टी आणि हेल्थकेअर हे क्षेत्रीय घटक वाढीसह उघडले आहेत. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

Back to top button