Stock Market Closing Bell | शेअर बाजार अस्थिर! सेन्सेक्स, निफ्टी सपाट, ‘या’ स्टॉक्सना फटका | पुढारी

Stock Market Closing Bell | शेअर बाजार अस्थिर! सेन्सेक्स, निफ्टी सपाट, 'या' स्टॉक्सना फटका

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण निर्णयापूर्वी आज मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले. सेन्सेक्स २९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ६६,३५५ वर बंद झाला. तर निफ्टी १९,६८० वर स्थिरावला. क्षेत्रीय निर्देशांकात मेटल आणि पॉवर निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले, तर PSU बँक, FMCG आणि रियल्टी ०.५ ते १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.४ टक्क्यांनी वाढले. एफएमसीजी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. (Stock Market Closing Bell)

एशियन पेंट्स, आयटीसीला फटका

सेन्सेक्सवर आज ६६,५३१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,५५९ पर्यंत गेला. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, टायटन, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एम अँड एम हे शेअर्स वाढले. तर एशियन पेंट्सचा शेअर ४ टक्के घसरून ३,४०० रुपयांपर्यंत खाली आला. आयटीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, एलटी, कोटक बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्सही घसरले.

Pudhari Economics WhatsApp group

स्पाईसजेटचे शेअर्स वाढले, जाणून घ्या कारण

डीजीसीएने बजेट एअरलाईन कंपनी स्पाइसजेटवरील देखरेख हटवल्यानंतर स्पाईसजेटचे शेअर्स (SpiceJet shares) बीएसईवर आज सुमारे ५ टक्क्यांनी वधारले आणि हा शेअर दिवसाच्या उच्चांकी ३१ रुपयांवर पोहोचला. डीजीसीएने स्पाइसजेटवर देखरेख ठेवणे बंद केले आहे, असे वृत्त पीटीआयने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.

टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील टॉप गेनर्स

जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात घसरण होऊनही BSE वर टाटा स्टीलचा शेअर (Shares of Tata Steel) ३ टक्क्यांहून अधिक वाढून ११९ रुपयांवर पोहोचला. तसेच जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर आज टॉप गेनर राहिला. हा शेअर ३.५० टक्के वाढून ८०२ रुपयांवर गेला.

TVS मोटर कंपनीचे शेअर्स (Shares of TVS Motor Company) आज ३ टक्के वाढून उघडले. टीव्हीएस मोटर फर्मचा वार्षिक नफा ४६ टक्के वाढून ४६८ कोटी रुपयांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर TVS मोटरचे शेअर्स वधारले. (Stock Market Updates)

जागतिक बाजार

दरम्यान, अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक काल सोमवारी वाढून बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. नॅस्डॅक कंपोझिट देखील वधारला.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर

तात्पुरत्या NSE डेटानुसार, गेल्या काही दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात ओघ वाढला होता. पण परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात निव्वळ विक्रेते राहिले. त्यांनी ८२.९६ कोटी रुपये भारतीय शेअर्स ऑफलोड केले, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ९३५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button