दुबईला जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानात तांत्रिक बिघाड; प्रवासी सुरक्षित

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तिरुअनंतपुरम  विमानतळावरून दुबईला जाणार्‍या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ( Air India, Express)  विमानात आज ( दि .२३ ) दुपारी उड्डाणानंतर  तत्‍काळ तांत्रिक बिघाड झाला. त्‍यामुळे पुन्‍हा विमान परतले. या विमानात असणारे सर्व १७४ प्रवासी सुरक्षित आहेत, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एअर इंडियाच्‍या विमानाने दुबईला जाण्‍यासाठी दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी उड्डाण केले. मात्र विमानातील वातानुकूलन (एसी )यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे हे विमान तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ वाजून ५२ मिनिटांनी परतले. दरम्यान, सर्व १७४ प्रवासी सुखरूप असून लवकरच त्यांना दुबईला दुसऱ्या विमानाने नेण्यात येईल, असेही या वृत्तात म्‍हटलं आहे. ( Air India Express )

या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तिरुअनंतपुरम ते दुबईपर्यंत कार्यरत असलेल्या IX-539 मध्ये टेक-ऑफनंतर तांत्रिक समस्या आली. तिरुअनंतपुरम येथे सावधगिरीने लँडिंग करण्यासाठी ऑपरेटिंग क्रू निवडले गेले. कंपनीने प्रवाशांसाठी तत्‍काळ दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news